महाराष्ट्र

श्री गजानन बँकेला महाराष्ट्र राज्यातुन सलग चारवेळा प्रथम सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीर. Shree Gajanan Bank was declared the first best bank award from the state of Maharashtra four times in a row

बीड — बीड जिल्ह्यातील यशस्वी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गजानन नागरी सहकारी बँकेला दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनकडून १०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका या गटातुन दिला जाणारा महाराष्ट्र राज्यातुन “प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या नागरी सहकारी बँकांच्या फेडरेशनमार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरी बँकाचा गौरव केला जातो.सन २०२२ सालच्या ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्कारासाठी युनिट बँका व १०० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका या गटातुन श्री गजानन नागरी सहकारी बीडला “प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी “भारतीय क्रिडा मंदिर, वडाळा, मुंबई येथे पुरस्काराचे वितरण
मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
सदर पुरस्कारा बाबत महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँकस् फेडरेशनचे पत्र मिळताच बँकेचे कर्मचारी वर्ग व सभासद, ठेवीदार, हितचिंतक आदींनी आनंद व्यक्त केला आहे.या पुर्वीही बँकेला सात वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा आठवा पुरस्कार आहे. बीड जिल्हा दुष्काळी परिस्थिती व मंदीचे सावट तसेच कोरोना सारख्या आजाराचे सावट असतांना सुध्दा बँकेने रिझर्व्ह बँकेचे सर्व नॉर्मस् पुर्ण केले. बँकेचे अध्यक्ष माजीमंत्री जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर यांचे अमुल्य अभ्यासु मार्गदर्शन व बँकेचे उपाध्यक्ष प्रा जगदीश वासुदेवराव काळे यांचे योग्य नियोजन तसेच मा. संचालक मंडळाची व बँक कर्मचाऱ्यांची योग्य साथ.यामुळे बँकेची आर्थिक स्थिती गतवर्षी पेक्षा अधिक मजबुत झाली आहे.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर.क्षीरसागर व सरव्यवस्थापक डॉ.एम.एस.शेख यांचे योग्य कार्यकुशल प्रशासन व नियोजन तसेच बँकेच्या प्रगतीमध्ये व्ही.एल. कुंबेफळकर (सहाय्यक व्यवस्थापक) यांनी व सर्वच कर्मचाऱ्यांनी अमुल्य परिश्रम घेतले.म्हणूनच हा पुरस्कार बँकेस मिळाला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button