राजकीय

शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! Shinde Fadnavis government’s cabinet was the time to expand!

मुंबई — मोठ्या प्रतीक्षेनंतर शिंदे सरकारचा पहिला मंत्री मंडळ विस्तार पार पडला.आता दुसरा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

. पितृपक्ष आल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराला ऑक्टोबर चा पहिला आठवडा उजाडणार आहे.5 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, असं वृत्त टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना संधी न मिळाल्यामुळे कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याच बरोबर जालन्याचे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह यांच्यासह जवळपास 50 जणांची नाव चर्चेत आहे. पण, मंत्रिमंडळाची संख्या पाहता यातील अर्ध्याचं नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात 19 जणांचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांचं जम्बो मंत्रिमंडळ असणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे पालकमंत्र्यांची घोषणाही रखडली आहे. लवकरच राहिलेल्या सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्री भेटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button