आपला जिल्हा

कोरोना रुग्ण सापडण्याची साखळी तुटली: 38 पैकी 36 अहवाल निगेटिव्ह

बीडरविवारी कोरोना संशयित रुग्णांचे 38 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 36 अहवाल निगेटिव आले असून दोन अहवाल अनिर्णीत अवस्थेत आहेत. मागील दोन-तीन दिवसापासून कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची संख्या मंदावल्यामुळे बीड करांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे.
मुंबईहून आलेल्या लोकांमुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांची संख्या 63 वर जाऊन पोहोचली होती. मात्र ज्या गतीने ही संख्या वाढली त्याच गतीने ही संख्या कमी करण्यात आरोग्य विभागाच्या टीमला यश प्राप्त झाले आहे रविवारी 14 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आतापर्यंत कोरणा मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. तर सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 27 वर आणण्यात यश मिळाले आहे. रविवारचा दिवस बीडकरांसाठी आनंदाचा ठरला असून 38पैकी छत्तीस जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत तर दोन जणांचे अहवाल अनिर्णीत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close