क्राईम
बापानेच केला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार. The father himself raped his minor daughter

गेवराई — तालुक्यातील रेवकी देवकी येथे जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन अपंग मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रतन लक्ष्मण गोरे वय 45 वर्ष , रा.रेवकी देवकी असे आरोपीचे नाव आहे . रतन गोरे या नराधमाने रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या राहत्या घरी आपल्या दहा वर्षीय अपंग मुलीवर बलात्कार केला. सायंकाळी ही घटना उघडकीस आली. पीडीत अपंग मुलीवर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आली मात्र तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी नराधम बापास अटक केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.