महाराष्ट्र

राज्य सरकारकडून ‘अनलॉक १’साठी तीन टप्प्यात निर्बंध हटणार

मुंबईकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील कंटेन्मेंटमध्ये केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. याबाबत केंद्राने कालच ३० मे रोजीच नियमावली जाहीर केली होती. यानंतर आता महाराष्ट्र सरकारने अनलॉक वन ची नियमावली आज जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत महाराष्ट्रात अनलॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याला ३ जूनपासून सुरुवात होणार आहे. दुसऱ्या टप्प्याला ५ जूनला सुरूवात होणार आहे. आणि तिसरा टप्पा ८ जूनला सुरू होणार आहे.

कंटेन्मेट झोनमधील कार्यालय वळगता इतर ठिकाणची कार्यालये सुरू होणार आहे. पार्किंगप्रमाणे सम-विषम पद्धतीन दुकाने सुरू करणार आहे. कॅरेज सुरू करण्याची करण्यास मुभा दिली आहे. रिक्षा आणि ट्रक्सी चारचाकीमध्ये चालक अधिक २ प्रवाशांची मुभा तर दुचाकीवर एका व्यक्तीला प्रवास करण्याची मुभा दिली आहे. दोन जिल्ह्यातंर्गत प्रवासास परवानगी दिलेली आहे. सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसेच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे याठिकाणी सकाळी ५ ते ७ या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.

३ जूनपासून अशी मिळणार सूट

  • सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसेच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे याठिकाणी सकाळी ५ ते ७ या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.
  • गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना
  • सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती ५ टक्के होती

५ जूनपासून अशी असणार सूट

  •  मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार
  • कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार
  • कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रुमची व्यवस्था उपलब्ध असणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच खरेदी केलेली वस्तू परत घेण्याची व्यवस्था अंमलात असणार नाही.
  • खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना
  •  अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई
  • खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते
  • सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान तात्काळ बंद करण्यात येईल.
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close