क्राईम

माजलगाव धरणात पोहायला गेलेल्या डॉक्टरचा बुडून मृत्यू; मृतदेहाचा शोध घेण्यात अपयश.Doctor who went swimming in Majalgaon Dam drowned; Failure to locate the ded body

माजलगाव — पोहण्यासाठी माजलगाव धरणामध्ये गेलेल्या बेलोरा येथील डॉक्टर दत्तात्रय फपाळ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. दरम्यान सायंकाळपर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र मृतदेह सापडण्यात यश आले नाही.


माजलगाव तालुक्यातील बेलोरा येथील डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ वय 45 यांचे तेलगाव येथे अजिंक्य हॉस्पिटल आहे . ते गेल्या काही दिवसापासून माजलगाव येथे वास्तव्यात होते.रोज सकाळी माजलगावच्या धरणामध्ये पोहायला जात असत नित्य नियमा प्रमाणे रविवारी ते पोहायला गेले असताना पोहत पोहत ते लांब गेले पोहत परत येत असताना त्यांना दम लागला त्यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.धरणात बुडालेल्या मृतदेहाचा शोध घेण्याची मोहीम सकाळपासून सुरु करण्यात आली. बीड , परळी येथील बचाव कार्य पथकाला बोलावण्यात आले. सोबतच माजलगाव अग्निशमन दल तसेच स्थानिक भोई यांच्याही माध्यमातून देखील शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले.तहसीलदार वर्षा मनाळे,तलाठी आर . आभारे , माजलगाव शहर पोलीस घटनास्थळी उपस्थित होते . दरम्यान रविवारी दिवसभर धरणामध्ये शोधमोहीम सुरू असली तरी मृतदेह सापडला नाही. मात्र अंधार पडल्यामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. उद्याएन डी आर एफ चे पथक देखील या शोध मोहिमेत सहभागी होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button