आपला जिल्हा

बीडाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल; आणखी 14 रुग्णांना मिळणार डिस्चार्ज

बीडजिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव लवकर होऊ शकला नव्हता मात्र मुंबई पुण्याहून आलेल्या लोकांनी डोकेदुखी वाढवली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या अर्धशतकी झाली असे असली तरी योग्य उपचार करून आरोग्य विभागाने पुन्हा गतीने कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. शनिवारी दहा जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला तर रविवारी 14 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतत आहेत

बीड जिल्ह्यात 63 जणांना कोरोना ची लागण झाल्याचे उघडकीस आले. सुरुवातीच्या काळात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे जिल्हा हादरून गेला होता. याच परिवारातील सहा जणांनी पुण्याला उपचार घेण्यासाठी जाणे पसंत केले. जिल्ह्यात असलेल्या विविध रुग्णालयात 41 सक्रिय रुग्णावर उपचार सुरु होते. बीड शहरातील एक व माजलगाव तालुक्यातील 13 जणांना आज घरी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 27 वर आली आहे त्यापैकी तीन जणांची प्रकृती खालावलेली आहे. आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. माजलगाव , गेवराई, केज हे तालुके आता कोरोना मुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आर ‌.बी .पवार यांनी दिली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close