माध्यामांच्या खालावलेल्या “स्तराला” नवोदित पत्रकारांनी बेडर होऊन लेप लावावा – जेष्ठ पत्रकार बर्दापूरकर. Budding journalists should be brave and cover the degraded “level” of media – Senior journalist Bardapurkar

मोबाईल जर्नालिझम कार्यशाळेचा उत्साहात झाला शुभारंभ
औरंगाबाद — पत्रकारिता एका अर्थाने साधना आहे. त्यामुळे, नव्या पिढीतील पत्रकारांनी वाचून विषय समजून घ्यावा आणि उपेक्षित घटकासाठी बेडरपणे लिहावे. आलेल्या आव्हानांना तोंड देऊन, माध्यमांच्या खालावलेल्या स्तराला लेप लावावा, असे आवाहन जेष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी येथे केले. मुरलेले लोणंचे जसे चवदार असते, तशी तुमची बातमी सुद्धा चवदार असावी; अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मोबाईल जर्नालिझम’ कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कार्यशाळेच्या प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार प्रतिभा चंद्रन, एमजीएम. वृत्तपत्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, डॉ. आशा देशपांडे, डॉ. कविता सोनी यांची उपस्थिती होती.बर्दापूरकर म्हणाले की, माध्यमं झपाट्याने बदलली आहेत. राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून भारतात आलेल्या संगणक क्रांन्तीने झालेले नव्या बदलाने इलेक्ट्रॉनिक माध्यमांना मार्ग दाखवला.1988 पर्यंत माध्यम हा शब्द ही माहित नव्हता. हळुहळू बदल होत गेले. ई – पेपर आले. चमत्कारिक बदलाने माध्यमांना नवी दिशा मिळाली. मात्र, व्यावसायिकता आली आणि माध्यमांचा स्तर खालावत चालला. मुळ प्रश्न, ग्रामीण भाग त्यामानाने उपेक्षित राहीला आहे. खर तर, पत्रकारिता साधना आहे. या साधनेच्या माध्यमातून नवा समाज अपेक्षित आहे. त्यामुळे, नव्या पिढीतील पत्रकारांनी वाचावे आणि बेडरपणे लिहावे, असे आवाहन करून त्यांनी सांगितले की, समाजातले नवे प्रश्न समाजा समोर आणा, आव्हानांना तोंड द्या. मुरलेले लोणच जसे चवदार असते तसे तुमचे विषय चवदार, त्याच बरोबर समाजोपयोगी असायला हवेत. पत्रकारांनी उपेक्षित घटकासाठी बेडरपणे लिहावे. आलेल्या आव्हानांना तोंड देऊन, माध्यमांच्या खालावलेल्या स्तराला लेप लावावा, असे आवाहन ही प्रविण बर्दापूरकर यांनी शेवटी बोलताना केले. कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले प्रशिक्षणार्थी पत्रकार, संपादक, मुंबई येथील साठे वृत्तपत्र महाविद्यालयाचे विद्यार्थी , एमजीएम चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन वृत्तपत्र महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विवेक राठोड यांनी केले. आभार डॉ. सोनी यांनी मानले.