आपला जिल्हा

बीडच्या रूग्ण संख्येत आणखी एकाची भर

बीडशनिवारी पाठवण्यात आलेल्या 38 स्वॅब पैकी 37 अहवाल निगेटिव्ह आला असून आणखी एक रुग्ण पाटोदा तालुक्यात सापडला आहे. रुग्ण सापडण्याची साखळी खंडित झालीच नाही.
बीड जिल्ह्यातून उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र जिल्ह्यात मुंबई, पुणे या ठिकाणाहून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे दररोज रुग्ण सापडत आहे. शनिवारी सकाळी अडतीस जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी सदतीस जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत. मात्र मुंबईहून पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे आलेला 38 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात सापडलेल्या रुग्णांची संख्या 63 वर जाऊन पोहोचली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close