कार-पिक अप अपघातात एक ठार एक गंभीर. One killed, one serious in car-pick-up accident

केज — अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळ मारुती ओमीनी इको आणि पिक-अपचा समोरा समोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु झाला तर दुसरा एकजण जखमी झाला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वा च्या दरम्यान केज अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळील हॉटेल निसर्ग जवळ अंबाजोगाई कडून केजकडे येणारे पिक-अप क्र. एम एच-४३/ए डी-७२१०चे टायर फुटल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटुन समोरून केज कडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या मारुती ओमिनी इको क्र. एम एच-१३/सी के-२६१४ या गाडीला समोरा समोर धडक दिली. यात ओमीनी इको मधील कपड्याचे व्यापारी महेश अंबादास पेटलपट्टी २७ रा. सोलापूर यांचा मृत्यू झाला तर व्यंकटेश भुपेंद्र इंगे ४७ रा. सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अपघातातील जखमींना नागरिकांनी रुग्णवाहिकेतून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.