आपला जिल्हा

30 जून पर्यंत लॉक डाऊन वाढवले, कंटेनमेंट पुरता मर्यादित राहणार

अनलॉक वन असे म्हटले जाणार

नवी दिल्लीदेशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या (Lockdown Extension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. (Lockdown 5.0 Rules Regulation) याला अनलॉक वन असं नाव देण्यात आला आहे

केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये (Lockdown 5.0 Rules Regulation) अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नव्या गाईडलाईन्सनुसार काय उघडणार? काय बंद?

 • कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार
 • कंटेनमेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन
 • रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदीर,मशिद धार्मिक स्थळं उघडणार
 •  रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार
 • रेड झोन बाहेर 8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी
 • राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही
 •  कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही
 • . दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिक
 • प्रतिबंधित क्षेत्रे राज्येच ठरवणार
 • .प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू
 • .शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय
 • . राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार
SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close