आपला जिल्हा

आनंद वार्ता: उपचारानंतर आज दहा रुग्णांना डिस्चार्ज

बीडजिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे. मुंबईहून परतलेल्या रुग्णावर दहा दिवस उपचार केल्यानंतर आता या दहा जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे.

यात पाटोदा तालुक्यातील मायलेकी केजचे दोन, बीडचे ५ आणि इटकूर येथील एका महिलेचा समावेश आहे
बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 62 वर जाऊन पोहोचली होती. यात एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला त्यानंतर तिच्या कुटुंबातील सहा जणांना पुण्याला उपचारासाठी पाठवण्यात आले. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत ५० रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील पाटोदा तालुक्यातील वाहली येथील मायलेकी, बीड शहरातील पाच, इटकूर येथील महिला व केज तालुक्यातील चंदणसावरगाव व केळगाव येथील रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना शनिवारी सायंकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता केवळ ४० रुग्ण उपचारासाठी राहणार आहेत. धारूर आणि पिंपळा येथील रुग्ण वगळता सर्व कोरोनाबाधित हे मुंबईहून आलेले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार व त्यांच्या टिमने या सर्व रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले आहे. बीड जिल्ह्यासाठी ही आनंदाची बातमी आहे

उपचारानंतर बरे झालेले रुग्ण

गेवराई तालुक्यातील इटकूर 2, माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील १, कवडगाव थडी येथील २, बीड शहरातील ५, पाटोदा तालुक्यातील वाहली येथील 2,  आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील १, केज तालुक्यातील केज व चंदनसावरगाव येथील 2,  असे १५ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान पाटोदा शहरातील 73 वर्षीय वृद्ध इसमास उद्या उपचारानंतर सुट्टी देण्यात येणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close