आपला जिल्हा

केज तालुक्यात असलेल्या या आठ गावातील संचारबंदी हटवली

बीड — उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे कळंब पासून सात किलोमीटर परिसरातील केज तालुक्यातील आठ गाव बफर झोन म्हणून जाहीर केली होती. मात्र आता हा परिसर बफर झोन राहणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले असून जनतेने मोकळा श्वास घेतला आहे.

                    केज शेजारी असलेल्या कळंब तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कडक पावले उचलत कळंब पासून सात कि मी परिसरातील केज तालुक्यातील आठ गाव बफर झोन म्हणून जाहीर केले होते. यात मांगवडगाव, सोने सांगवी, माळेगाव, लाखा ,भोपळा ,हदगाव ,सुर्डी, बोरगाव या गावांचा समावेश करण्यात आला होता. याठिकाणी अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती परिणामी येथे असलेल्या शेतकऱ्यांना शेतीची काम करण जिकिरीचे होऊन बसलं होतं. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना ही कामं खोळंबली होती. शेतात असलेल्या जनावरांना चारा पाण्याची सोय करणं सुद्धा अवघड होऊन बसलं होतं.दरम्यान रुग्ण आढळून आल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून तिथे एकही रुग्ण आढळला  नाही. त्यामुळे या  परिसरातील प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथील करण्यात यावी याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला.त्यानंतर आठ गावातील संचारबंदी मागे घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुधारित आदेशातून कळवले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close