क्राईम

मराठा समाजाविरुद्ध अपशब्द; बीडमध्ये पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. Slander against the Maratha community; A case has been registered against a police officer in Beed

दिंद्रुड — जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी काही दिवसांपूर्वी मराठा समाजाविरुद्ध अपशब्द वापरत दोन गटात मतभेद निर्माण केले व समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.याविरोधात माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मराठी क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक हनुमान कालिदास फपाळ यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस स्टेशनला शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये
जळगावचे स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत अनेक अपशब्द वापरले आहेत यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाज आता आक्रमक होताना दिसत असून माजलगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्यसमन्वयक हनुमान फपाळ यांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी उपसरपंच युवराज ठोंबरे,पांडुरंग झोडगे,कुंडलिक मायकर, दत्तात्रय ठोंबरे,राज झोडगे, अतुल चव्हाण,बाबा कांबळे याप्रसंगी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button