आरोग्य व शिक्षण

केएसके ’मध्ये नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता. Approval of new postgraduate courses in KSK

बीड — येथील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदव्युत्तर स्तरावर एम.एस्सी.रसायनशास्त्र (केमिस्ट्री),भौतिकशास्त्र (फिजिक्स),गणित(मॅथेमॅटीक्स)या विषयांना तर पदवीस्तरावरती मानसशास्त्र या विषयाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,ओैरंगाबादची मान्यता नुकतीच मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर यांनी दिली.
के.एस.के.महाविद्यालयात शैक्षणीक वर्ष २०२२-२०२३ साठी एम.एस्सी.रसायनशास्त्र (केमिस्ट्री),भौतिकशास्त्र. (फिजिक्स),गणित(मॅथेमॅटीक्स) या विषयांना तर पदवीस्तरावरती मानसशास्त्र विषयास विद्यापीठ मान्यतेसाठी  प्राचार्य डॉ.दीपा  क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात पाठपुरावा चालू होता. महाविद्यालयात बी.एस्सी.च्या दोन तुकड्या असल्यामुळे विद्यार्थी बी.एस्सी.झाल्यावर एम.एस्सी.साठी विद्यापीठात अथवा बाहेरगावी जात होते. परंतु आता पदव्युत्तर शिक्षणाची सोय बीड येथे महाविद्यालयात झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.सदरील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छूक विद्यार्थ्यांनी त्वरीत प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शिवानंद क्षीरसागर,उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर,उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतिश माऊलगे,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पंडित खाकरे, गणित विभाग प्रमुख प्रा.शंकर राऊत, उपप्राचार्य सय्यद लाल,पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button