विवाहितेचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव;पतीसह सासू-सासर्याविरोधात खुनाचा गुन्हा. Murder of wife and fake suicide; murder case against husband and mother-in-law

गेवराई — विवाहित महिलेचा खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव सासरच्या मंडळीने केला होता. मात्र माहेरच्या मंडळीने आक्रमक भूमिका घेऊन पहाटे तीन वाजता मृतदेह जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर ठेवण्यात आला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली व पुन्हा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेशीत केले. त्यानुसार अंबाजोगाई येथे शवविच्छेदन झाले. शुक्रवारी (दि.१६) दुपारी चकलांबा पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासर्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना कोळगाव येथे घडली.
प्रियंका भाऊसाहेब येडे रा. कोळगाव, वय २८ वर्षे या महिलेचा गुरुवारी दि.१५ सप्टेंबर रोजी संशयास्पद मृत्यु झाला. महिलेने आत्महत्या केल्याचे सासरच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र माहेरच्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. आमच्या मुलीचा खून झाल्याचे सांगून खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती.पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातील टाळाटाळ केली.त्यामुळे पहाटे तीन वाजता मृतदेह जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयसामोर ठेवण्यात आला होता.पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून शवविच्छेदन अंबाजोगाईच्या रुग्णालयात करून घेऊ, असे आश्वासन दिले व अंबाजोगाई रुग्णालयात शुक्रवारी दि.१६ सप्टेंबर रोजी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर आरोपी पतीसह सासु-सासर्याविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.