आपला जिल्हा

शेवटी बीडमध्ये आणखी एक रुग्ण सापडलाच

बीडशहरात करोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी मुंबईहून बालेपीर भागात आलेली महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
आज पाठविण्यात आलेल्या 118 स्वॅब पैकी 116 जणांचे अहवाल निगेटिव आल्यामुळे बीड सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र दोन अहवाल प्रलंबित होते. या दोन अहवालापैकी एका चा अहवाल पॉझिटिव आला असून केज येथील रुग्णाच्या अहवालाचा निष्कर्ष निघू शकला नाही. आज आढळून आलेली 40 वर्षीय रुग्ण महिला मुंबई येथून बालेपीर भागात आलेली आहे. त्यामुळे कालपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 51 वर जाऊन पोहोचली होती मात्र आज दोन रुग्ण पूर्व मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे हा आकडा 49 वर आला होता मात्र त्यात आणखी एका रुग्णाची भर पडल्यामुळे हा आकडा 50 वर जाऊन पोहोचला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close