कृषी व व्यापार

“पीक विमा आमच्या हक्काचा,नाही कोणाच्या बापाचा “अशा घोषणा; विम्यासाठी भर पावसात शेतकऱ्यांचे धरणे. “Crop insurance is our right, not anyone’s father’s” slogan; Farmers’ dams in heavy rains for insurance

बीड — जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकर्‍यांना सोयाबिन पिकाच्या नुकसानापोटी अग्रीम २५ टक्के विम्याची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी दि.१६ सप्टेंबर रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी एकजूट संघर्ष समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘पीक विमा आमच्या हक्काचा,नाही कोणाच्या बापाचा’म्हणत केलेल्या घोषणाबाजीने पूर्ण परिसर दणाणून गेला होता.दरम्यान शेतकरी आणि लोकप्रतिनिधीची एकजूट पहिल्यांदाच विम्याच्या प्रश्‍नावर पाहायला मिळाली.

बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी सर्वात जास्त सोयाबीन पिकाची लागवड झाली.ऑगस्ट महिन्यामध्ये फक्त तीन दिवस पाऊस पडला.२७ दिवस पावसाने दडी मारली होती. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाचं बरच नुकसान झालं.सुरुवातील जिल्हा प्रशासनाने १६ मंडळांसाठी २५ टक्क्याचा अग्रीम मंजूर केला.मात्र हा निर्णय इतर शेतकर्यांवर अन्याय करणारा आहे.

सत्तेत असलेल्या भाजपचे जिल्ह्यात तीन आमदार व खासदार असताना देखील त्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं त्यांचा साधा जिल्हाध्यक्ष अथवा एखादा पदाधिकारी या आंदोलनाकडे फिरकला देखील नाही. सोबतच शिंदे गटाला देखील शेतकऱ्यांचे अलर्जी असल्याचं पाहायला मिळालं. पण याच शेतकऱ्यांच्या जीवावर राजकारण करायचं आहे याचा विसर यांना आज पडला असला तरी जनता याचा चोख उत्तर देईल अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सरसगट शेतकर्‍यांना २५ टक्क्यांचा लाभ द्यावा.यासाठी तीन दिवसांपूर्वी आ.प्रकाश सोळंके यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती.यानंतर ४७ महसूल मंडळांना मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.पण सर्व महसूल मंडळातील शेतकर्‍यांना मदत मिळायला हवी यासाठी या बैठकीमध्ये आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यात आली.

शुक्रवारी (दि.१६) आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. महाधरणे आंदोलनामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, विजयसिंह पंडित, अशोक हिंगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अशोक डक,मोहन जाधव, पृथ्वीराज साठे, भारत जगताप, उद्धव घोडके, कुलदीप करपे, धनंजय गुंदेकर आदी लोकप्रतिनिधींसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button