बीड ते मातोश्री पायी निष्ठा यात्रेला सुरुवात. Beed to Matoshree begins the Nishta Yatra on foot

बीड — शिवसेनेतील बंड व त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर या शिवसेनेच्या कठीण काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खंबीर साथ देण्यासाठी बीड जिल्ह्याचे माजी तालुकाप्रमुख उल्हास गिरमे यांच्या नेतृत्वाखाली १५ सप्टेंबर पासून पायी निष्ठा यात्रेला सुरुवात झाली आहे.
आज सकाळी ९ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बीड ते मुंबई अशी २१ दिवसांची ही पायी निष्ठा यात्रा निघाली आहे.
बीड शहरातून आज सकाळी म्हणजे १५ सप्टेंबर २०२२ रोजी निष्ठा यात्रा मुंबईकडे निघाली आहे. नायगाव मधील हनुमान टेकडी येथे पहिला मुक्काम तर दहावा मुक्काम पिंपळे जगताप चौक वांजेवाडी, पंधरावा मुक्काम खोपोली तालुक्यातील साजगाव, सोळावा मुक्काम खानापूर, सतरावा मुक्काम आजीवली, अठरावा मुक्काम खारगर नवी मुंबई, एकोणीसावा मुक्काम वाशी नवी मुंबई, विसावा मुक्काम चुनाभट्टी चेंबूर येथे असून ५ आॅक्टोबर २०२२ रोजी दादर शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्यात निष्ठा यात्रा पोहोचेल. दसरा मेळाव्यात ही यात्रा विलिन होणार आहे.
या पायी निष्ठा यात्रेला जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान पिंगळे, हनुमान जगताप, आशिष मस्के, सुशील पिंगळे, जिल्हा संघटक नितीन धांडे भगवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही यात्रा मुंबईकडे रवाना झाली. या दिंडीत माजी तालुकाप्रमुख उल्हास गिराम, माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब पिंगळे, विलास महाराज शिंदे, सुनील अनभुले, पंकज कुटे, गोरख सिंगण, सुनील गवते, प्रदीप काटुळे, बाळू वैद्य, नंदू जोगदंड, अक्षय काशीद आदींसह दीडशे शिवसैनिकांनी उपस्थित होती
निष्ठा यात्रेत शिवरथाची व्यवस्था करण्यात आले आहे. यात्रेत सहभागी शिवसैनिकांना चहा, नाश्ता, जेवण, पाऊस आल्यास रेनकोट, मुक्कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी व्यवस्था, आरोग्याच्या देखरेखीसाठी उपचारासाठी, रुग्णवाहिका व तज्ज्ञ डॉक्टर असणार आहेत. सहभागी शिवसैनिकांचा विमाही उतरवण्यात आला आहे.