क्राईम

धारदार शस्त्राने पत्नीचा खून करून पती पोलिस ठाण्यात हजर

बीडजालना रोडवरील पेट्रोल पंपाच्या जवळ 35 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने वार करत निर्घुण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. ही घटना शुक्रवार दि.29 रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली

हिना पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात उर्मिला रमेश मस्के वय 35 वर्ष रा.मंत्री गल्ली बीड या महिलेची तिच्या पतीने धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. या महिलेचा पती रमेश वैजनाथ मस्के हा ही घटना घडल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत, सपोनि. गजानन जाधव यांच्यासह शहर पोलीसांनी धाव घेतलीआहे. पोलिसांनी शव ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा केला मात्र ही हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप समजू शकले नाही या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close