आपला जिल्हा

गुरुजींनो भोगा आपल्या कर्माची फळ: सुजान संस्कारी माणूस घडवायला सांगितला, तुम्ही घडवले पुस्तकी किडे, शिक्षकांना किराणा सामान घरपोच देण्याचे आदेश

बीडशाळेतील शिक्षकांचे स्थान आजही गुरुस्थानी आहे मात्र या शिक्षकांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही त्यांना सुजान संस्कारी पिढी घडवायची सांगितली तर त्यांनी पुस्तकी किडे तयार केले. परिणामी अधिकारीपदावर बसलेली ही मंडळी आता शिक्षकांनाच तुच्छतेची वागणूक देत डिलेवरी बॉय चे काम सोपवत आहेत. बीडला संचारबंदी लागू केल्यानंतर लोकांना किराणा सामानाची टंचाई भासू नये यासाठी 628 शिक्षकांची किराणा सामान घरपोच नेऊन देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे ‌
शिक्षक आज पर्यंत प्रशासकीय पातळीवर प्रत्येक जबाबदारी सक्षमतेने पार पाडत आला आहे. शासनाचे एखादे सर्वेक्षण असो, जनगणना असो ही मतदार नोंदणी चे कार्य असो ज्ञान दानाबरोबरच ही जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात येते. समाजजीवनाला दिशा दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या शिक्षकांना गुरुजी असं संबोधलं जातं. कोरोना महामारीच्या संकटात चेक पोस्टवर पहारा देण, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका, रेशनिंगचा माल जनतेपर्यंत पोहोचतो की नाही यावर लक्ष ठेवणे यासारख्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. संकटाची भीषणता लक्षात घेता कोविड योद्धे म्हणून मी काम का करू असा कधीच नाराजीचा सूर त्यांनी आळवला नाही. परिणामी “मुकी बिचारे , कुणी हाका रे “अशी अवस्था त्यांची झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बीड शहरात मध्यरात्री आदेश काढून संचारबंदी लागू केल्यानंतर लोकांच्या खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे होऊन बसले. घरात जे आहे ते खाऊन लोकांनी एक दिवस कसाबसा घालवला टीका होऊ लागली की जिल्हाधिकाऱ्यांनी यात सूट देत किराणा दुकानदाराची यादी प्रसिद्ध केली. जनतेने घराबाहेर न निघता सूद्धा किराणा सामान घरपोच मिळवणे शक्य व्हावे यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आता शिक्षक डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत वावरू लागले आहेत त्याकरीता 628 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसामान्य नव्हे तर शिक्षकांमधूनही आता हे काम सोपवल्या मुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अनेक शिक्षक बाहेरगावचे असल्यामुळे त्यांनी राहायचे कुठे खायचे काय असे प्रश्न सुद्धा आता भेडसावू लागले आहेत. शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
यावर टीका करताना काहीजण गुरुजींनो तुम्हीच चुकलात तुम्हाला संस्कारी, सुजान नागरिक घडवण्याची जबाबदारी सोपवली होती तुम्ही ती जबाबदारी पार पाडली नाही पुस्तकी किडे तयार केले तेच पुस्तकी किडे आता अधिकारी झाले अन तुमच्या प्रति असलेली गुरुची भावना लयाला गेली. नोकर समजून पडेल ते काम सोपवण्यातच ते आता धन्यता मानू लागले आहेत. अशी टिप्पणीही केली जाऊ लागली आहे .

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close