एस.के.एच. वैद्यकीय महाविद्यालयाचा ४८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. S.K.H. 48th Anniversary of Medical College celebrated with enthusiasm

बीड — आदर्श शिक्षण संस्था, बीड संचलित सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचा ४८ वा वर्धापन दिन दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी साजरा करण्यात आला . कॉलेजच्या संस्थापिका स्व. केशरबाई क्षीरसागर उर्फ काकू आणि स्व. सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी प्रा.रावसाहेब हांगे यांनी महाविद्यालयाने स्थापनेपासून आतापर्यंत ओलांडलेले विकासाचे टप्पे विस्तृतपणे मांडले.त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मटेरिया मेडिका विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. रत्ना क्षीरसागर यांनी स्वतःचे अनुभव आणि कॉलेजचा ४८ वर्षाचा आढावा सादर केला. त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल यांनी रुग्णसेवेबरोबरच संशोधनात्मक उपक्रम राबवणाऱ्या आपल्या महाविद्यालयाने आजवर हजारो निष्णात पदवीधर व पदव्युत्तर डॉक्टर्स घडवले आहेत तसेच महाविद्यालयाचा अजून कसा विकास होऊ शकेल याबद्दल मार्गदर्शन करून महाविद्यालयाला आणखी एका उंचीवर नेण्यास प्रयत्न करू असे सांगितले. महाविद्यालयाच्या वर्धापन दिना निमित्त राष्ट्रीय पोषण महिन्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पदव्यूत्तर बालरोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. पुनम शिंदे यांनी महिला व बालकाचे पोषण, आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे दृष्टीने २०१८ पासून दरवर्षी १ ते ३० सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण महिन्याच्या आयोजनाचे महत्व सांगितले . तसेच यावर्षी महिला व बाल विकास मंत्रालय पाचवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करत आहे जो केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पोषण अभियानाचा एक भाग असून त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमच्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणारे उपक्रमांची आणि कुपोषणावर जनजागृती पर विविध कार्यक्रमांची त्यांनी माहिती दिली.महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.गणेश पांगारकर यांनी अशा राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यक्रमांमध्ये कॉलेजचे नेहमीच योगदान असते असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अरुण भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास डॉ.नासेर शेख, डॉ. कीर्ती ठाकूर, डॉ.अनिस अहमद, नायाब खान , पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ.वैभव शहापुरे व आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर जोशी यांनी केले.