आपला जिल्हा

बीडकरांना दूध, भाजीपाला, गॅस ,जारचे पाणी घरपोच सेवा घेता येणार

बीडकोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीड शहरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जनतेला भाजीपाला दूध गॅस सारख्या आवश्यक गरजा पूर्ण करणे अवघड झाले होते. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढत दूध वितरण तसेच परवानाधारक विक्रेत्यांना भाजीपाला डोअर टू डोअर, पाण्याचे जार विक्री करण्यास परवानगी दिली आहे.
नवीन काढलेल्या आदेशात दूध विक्रेत्यांना दूध विक्री करण्यास परवानगी दिली आहे. दुधाचे पाकीट घरपोच देता येणार आहे. याबरोबरच परवाना घेतलेल्या भाजीपाला विक्रेत्यांना डोअर टू डोअर जाऊन भाजीपाला विकता येणार आहे. पाण्याचे जार घरपोच देता येणार आहेत परंतु ग्राहकाला त्याच्या जार मध्ये पाणी ओतून द्यावे लागणार आहे. आपल्या जवळच्या जारचे आदान प्रदान करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र ही सेवा देताना सामाजिक अंतर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडर वितरणास देखील परवानगी देण्यात आली आहे. गॅस कंपन्यांच्या गणवेश धारकास किंवा पास असणाऱ्या व्यक्तीस घरपोच गॅस सिलेंडर नेऊन देता येणार आहे. घरपोच किराणा सामान देण्यासाठी लवकरच आदेश काढण्यात येणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close