कृषी व व्यापार

पिक विम्यासाठी 16 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन. Mahadharna protest in front of collector office on September 16 for crop insurance

बीड — जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अग्रीम विमा मिळालाच पाहिजे या मागणीसाठी सर्वपक्षीय बैठक शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली असून 16 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय समोर महा धरणे आंदोलन करण्यात येणार असून शेतकऱ्यांसाठी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वच नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे.

जिल्ह्यात गोगलगायी संकटानंतर अतिवृष्टी झाली मात्र त्यानंतर महिना सव्वा महिना पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीन पिकाची फुलगळ झाली. शेंगा ही गळाल्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे. सोबतच उडीद मुगासारख्या पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रीम विमा मिळावा यासाठी विमा कंपनीने 16 महसूल मंडळाचा समावेश केला. त्यानंतर शेतकऱ्यांनी संघटितपणे या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेंड चालवला. परिणामी राजकीय नेत्यांचे खाडकन डोळे उघडले.परिणामी त्यांनाही शेतकऱ्यांच्या आवाजात आवाज मिसळावा लागला. दबाव वाढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी महसूल मंडळाची अग्रीम विम्यासाठी भर पडली असून 47 महसूल मंडळांचा अधिसूचनेत समावेश करण्यात आला आहे. एक ते दीड मिलिमीटर पावसाचे कारण पुढे करत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विम्याची अग्रीम देण्यास नकारच दिला होता. मात्र त्याला न जुमानता जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन अधिसूचना काढली आणखी महसूल मंडळाचा समावेश केला.असं असलं तरी विमा कंपनी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचने विरोधात अपीलही करू शकते. त्यामुळे कोणत्याही महसूल मंडळातील शेतकऱ्यांने गैरसमजात न राहता संघटितपणे आंदोलनात सहभागी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. विमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणा विरोधात आवाज उठवण्यासाठी आज भाजप वगळता सर्व पक्षांनी एकत्रित येऊन शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. 16 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरचे आंदोलन टप्प्या टप्प्याने होणार असून आता शेतकर्‍यांसाठीचे आंदोलन शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची भूमिका आ. प्रकाश सोळंके यांनी मांडली. सोळंके यांनी बोलावलेल्या या बैठकीला माजी आ. राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, सुशिलाताई मोराळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, विजयसिंह पंडित, राजेसाहेब देशमुख, राजेश्वर चव्हाण, जयसिंह सोळंके, कुलदीप करपे, धनंजय गुंदेकर, सुनिल सुरवसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपले राजकीय जोडे बाजुला ठेवून 16 तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आ. सोळंके यांनी केले आहे.पंतप्रधान पिकविमा योजनेतून अनेक राज्य बाहेर पडले. गुजरात राज्य सुद्धा यातून बाहेर पडले असून महाराष्ट्रानेही पडावे आणि आपले स्वतंत्र विमा धोरण ठरवावे, असे सांगत जिल्हाधिकारी विमा कंपनीच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोप आ. प्रकाश सोळंके यांनी केला आहे.
आ. सोळंके यांनी आज दुपारी शासकीय विश्रामगृह येथे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. पुढे बोलताना सोळंके म्हणाले, अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात 86 टक्के पिकांचे नुकसान झाले. तसा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिलेला आहे. तरीही बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. अग्रीमच्या बाबतीतही चुकीचा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात 16 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर काही मंडळांची वाढ करण्यात आली. आमची मागणी आहे की, सर्वच मंडळांना अग्रीमचा लाभ मिळाला पाहिजे, त्यासाठी आम्ही सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते एकत्रित आलो असल्याचे सांगून पंतप्रधान पिक विमा योजनेतून राज्य सरकारने बाहेर पडावे, देशातील अनेक राज्य या योजनेतून बाहेर पडलेले आहेत. गुजरातसुद्धा बाहेर पडले, महाराष्ट्रानेही या योजनेतून बाहेर पडून स्वत:चं पिकविमा धोरण ठरवावं, अशी मागणी आ. सोळंके यांनी या वेळी

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button