क्राईम

तहसिल कार्यालयात घुसून नायब तहसिलदारांना मारहाण

परळीचार अज्ञात व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधुन तहसिल कार्यालयात घुसुन तहसिलदार कुठे आहेत अशी विचारणा करत नायब तहसिलदार बाबुराव रुपनर व एका कर्मचार्यास लाथा बुक्याने मारहाण केल्याची घटना घडली.
परळी तहसिल कार्यालयात आज दि.28 मे रोजी दुपारी 3.30 वा.दारु पिऊन चार जणांनी प्रवेश करत कागदपत्रांच्या प्रतिची मागणी केली.कर्मचार्यांनी थोडा वेळ लागेल असे सांगितल्यानंतर गोंधळ घालावयास सुरुवात केली.गोंधळ पाहुन नायब तहसिलदार बाबुराव रुपनर हे तेथे आले व शासकीय कार्यालयात गोंधळ घालू नका असे सांगितल्यानंतर तहसिलदार कुठे आहेत अशी विचारणा करत त्या चौघा मद्यपींनी रुपनर व अन्य एका कर्मचार्यास लाथा बुक्यांनी मारहाण केली ते चौघे बेलंबा येथील असल्याचे समजते. तहसिल कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेतकर्यांनी हल्लेखोरांनी रोखले. यात रुपनर यांच्या छातीत मार लागला असुन याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close