क्राईम

केज जवळ झालेल्या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

इक्बाल शेख

केज — कळंब येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेलेे पोलिस कर्मचाऱ्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. या दुर्घटनेत पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना केज – कळंब रस्त्यावरील चिंचोली पाटी जवळ सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
कळंब येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी विवेकानंद विलास गिरी वय 35 वर्ष या.केज हे स्कॉर्पिओ क्र. एम एच 44 एस 4302 या गाडीने कळंबहून केज कडे आई-वडिलांना भेटण्यासाठी येत होते. चिंचोली पाटी जवळ आल्यानंतर त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे गाडी पलटी झाली. या अपघातात विवेकानंद गिरी हे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close