आपला जिल्हा

सहा फुटाचे सोशल डिस्टन्स पुरेसे नसल्याचा संशोधकांचा दावा

लॉस एंजेलिसकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सगळेच सध्या सुरक्षित अंतराचा नियम पाळतात. मात्र, सध्या तरी एकमेकांमधील फक्त सहा फुटांचे अंतर पाळणे पुरेसे नसल्याचा दावा कॅलिफोर्निया विद्यापीठातील अभ्यासकांनी केला आहे. 

तापमान कमी आणि दमटपणा जास्त असेल, तर विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. मात्र, तापमान जास्त आणि दमटपणा कमी असणे हे लहान ‘एरोसोल कण’ तयार होण्यासाठी पोषक वातावरण आहे. उष्ण आणि कोरड्या हवामानात तर संसर्गाची शक्यता सर्वांत मोठी आहे. विविध प्रकारच्या वातावरणानुसार करोनाच्या विषाणूचा संसर्ग जवळपास १९.७ फुटांपर्यंतही होऊ शकतो; म्हणूनच ‘सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने (सीडीसी) सांगितलेले सहा फूट अंतर पाळण्याचे निकष पुरेसे नसल्याचे संशोधकांचे मत आहे. 

वाचा: विमान प्रवासातून विषाणूंचा सहज फैलाव अशक्य! 
वाचा: करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कापडी मास्क अधिक उपयुक्त! 

विविध प्रकारच्या हवामानात विशेषत: थंडी आणि दमट हवामानात खोकणे, शिंकणे आणि श्वासोच्छवासातूनही करोनाचा प्रादुर्भाव तिपटीने पसरू शकतो. यापूर्वीच्या संशोधनाच्या आधारे संशोधकांनी सांगितले, की, शिंक, खोकला आणि अगदी बोलण्यामुळेही सुमारे ४० हजार श्वसनाच्या थेंबांची निर्मिती होऊ शकते. हे थेंब पसरण्याचा सुरुवातीचा वेग सेकंदाला काही मीटर ते सेकंदाला १०० मीटरपेक्षाही जास्त आहे. वातावरण आणि थेंबांचा वेग हे दोन्ही करोना विषाणूच्या संसर्गावर परिणाम करू शकतात. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close