क्राईम

चौसाळ्यात विशेष पथकाने साडेचार लाख रुपयांचा गुटखा पकडला. A special team seized a gutkha worth four and a half lakh rupees in Chausala

बीड — चौसाळा येथे पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या गुटख्याच्या साठ्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारून साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई 13 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.

सध्या बीड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांचं विशेष पथक अवैध धंद्यावर धडक कारवाई करत असल्याचं पाहायला मिळू लागला आहे. चौसाळा येथे देखील विशेष पथकाने कारवाई केल्यामुळे अवैध धंद्ये चालवणारा मध्ये खळबळ माजली आहे. मंगळवारी 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी जैन नगर भागातील पत्र्याच्या शेडमध्ये गुटखा ठेवला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ कारवाई करत या ठिकाणी छापा मारला असता अवैधरीत्या साठा केलेला चार लाख 47 हजार 348 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी हा गुटखा जप्त केला असून याप्रकरणी प्रशांत उर्फ बबलू रेवननाथ शिंदे रा. चौसाळा यास ताब्यात घेतले.त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 328,188,272 , 273 प्रमाणे नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर , अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनि . विलास हजारे , पोलीस नाईक शिवदास घोलप , पोलीस नाईक विकास काकडे , पोलीस अमलदार किशोर गोरे , पोलीस अमलदार विनायक कडू , , पोलीस अमलदार बालाजी बास्टेवाड , चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button