आपला जिल्हा

एका रुग्णाने बारा गावचे बारा वाजवले, आठ दिवसांसाठी संचारबंदी लागू

बीड — पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने अनेक ठिकाणी भेटी दिल्या त्यामुळे एकच खळबळ माजली असून आज पासून चार जून पर्यंत बीड शहर आणि बारा गावामध्ये पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कारेगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बीड शहरात सर्वत्र फिरला त्याबरोबरच ग्रामीण भागात देखील त्याने संपर्क ठेवला. कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये याची खबरदारी घेत जिल्हा प्रशासनाने बीड तालुक्यातील खंडाळा, च-हाटा, पालवण, इट, पाटोदा तालुक्यातील वैजाळा ,डोंगरकिन्ही, वडवणी तालूक्यातील देवडी, गेवराई तालूक्यातील खांडवी, मादळमोही , धारवंटा, केज तालूक्यातील खरगाटा व धारुर तालूक्यातील पारगांव येथे आठ दिवसांसाठी (4 जुन 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत ) संपूर्ण संचारबंदी घोषित  करण्यात आली आहे. घराच्या बाहेर पडण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे.

खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

■ वैद्यकीय सेवा , वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा 24 तास सुरु राहतील

■  बीड शहरात व  वरील गावांमध्ये विशेष परवानगी शिवाय कोणालाही या कालावधीत प्रवेश करता येणार नाही. व शहरा बाहेरही जाता येणार नाही.
■ अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये वगळता (महसूल, ग्रामविकास व आरोग्य बीड शहरातील सर्व आस्थापना (शासकीय, खाजगी व बैका इ.) बंद राहतील, परंतु बीड शहरातील शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुखांना व बैंक यांना अतिशय आवश्यकता भासल्यास उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड यांचेशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून कार्यालय उघडण्याची व अतिशय मर्यादीत कर्मचाऱ्यांनाच बोलविण्याची परवानगी घ्यावी.

■ बीड शहरातील व वरील गावांतील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पास मिळणार नाही, पंरतु मेडीकल Emergencey मधील पाससाठी बीज शहरातील नागरिकांनी
ऑनलाईन अर्ज www. covid19.mhpolice. in या वेबसाईटवर भरुन पास प्राप्त करुन घ्याया.

■ बीड शहरातील व वरील गावांमधील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप तात्काळ डाऊनलोड करुन वापरणे
बंधनकारक राहील, 

■ वरील बीड शहर व गावे वगळता अन्य गावांसाठी पूर्वी प्रमाणेच आदेश लागू राहणार आहेत. 

असे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी काढले आहेत. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close