आपला जिल्हा

आठ दिवस बीड शहर कडकडीत बंद; संचारबंदी लागू

बीडकोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बीड शहर पुढील आठ दिवस कडकडीत बंद ठेवून संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह असलेला रुग्ण बीड शहरातील बहुतांश ठिकाणी दुचाकीवरून फिरला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संक्रमणाला आळा बसावा या उद्देशाने आठ दिवस बीड शहर लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्याबरोबरच संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे. सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने रुग्ण सापडला तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला होता. मात्र रुग्ण पूर्ण शहरात फिरला असल्याने धोका वाढला आहे. ही संचारबंदी चार जून पर्यंत लागू राहणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close