क्राईम
माजलगावात फेमस दूध डेअरीत चोरी ;लाखोंची रोकड पळवली. In Majalgaon, famous milk dairy was robbed of lakhs of rupees

माजलगाव — शहरातील गजानन रोड वरील परिवर्तन बँकेसमोर असलेली फेमस दुध डेअरीतून काल रात्री अनोळखी दोन चोरट्यांनी 1 लाख 9500 रूपयासह एक मोबाईल लंपास केला. याप्रकरणी दोन जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिस बाबु शेख यांची माजलगाव शहरातील गजानन रोड परिवर्तन बँकेसमोर फेमस नावाची दुध डेअरी आहे. काल रात्री त्यांनी दुध डेअरी बंद करून घरी गेले यावेळी अनोळखी दोन इसमांनी शटर उचकटून गल्ल्यातील 1 लाख 9500 रूपये तसेच एक मोबाईल लंपास केला. या प्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.