क्राईम

भूम तालुक्यात शिवसेना पं.स. सदस्याची ग्रामपंचायत कार्यालयासमोर हत्या

उस्मानाबादभूम तालुक्यातील वंजारवाडी पंचायत समितीचे शिवसेना सदस्य बाजीराव तांबे यांची ग्रामपंचायत कार्यालयासमोर निर्घून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

भूम तालुक्यात असलेल्या देवळाली गावातील शिव रस्त्यावरून बाजीराव तांबे आणि त्यांचे चुलत बंधू चंद्रकांत तांबे यांच्याय गेल्या अनेक दिवसात चालू होते. याप्रकरणी पोलीस व महसूल विभागात तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू होती मात्र मंगळवार दि. 26 मे रोजी प.स.सदस्य बाजीराव तांबे आणि चंद्रकांत तांबे यांच्या त पुन्हा वाद उफाळून आला. बाचाबाचीचे रूपांतर शेवटी मारहाणीत झाले. यात बाजीराव तांबे यांच्यावर चंद्रकांत यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला यात ते गंभीर रित्या जखमी झाले. बाजीराव तांबे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी बार्शी येथे हलवण्यात आले मात्र रस्त्यातच ते मृत्युमुखी पडले. याप्रकरणी चंद्रकांत तांबे यांच्यासह बारा जणांविरोधात परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर अकरा जण फरार आहे या प्रकरणाचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close