क्राईम

परळीत साडेचार लाखाचा गुटखा पकडला. Gutkha worth four and a half lakhs was caught in Parli

परळी — शहरातील विद्यानगर भागात विक्रीसाठी आणलेला गुटख्याने भरलेला छोटा हत्ती टेंम्पो अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने पकडुन 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा वाहनासह जप्त केला असुन याप्रकरणी दोघाविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . विद्यानगर भागात एका वाहनातून विक्रीसाठी गुटखा आणण्यात आल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांना मिळाली. सोमवार दि.12 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता अनिल दौंड , उपनिरीक्षक सिंगाडे मॅडम , चाँद मेंडके , पोना . देवकते , पोशि . राऊत , खंदारे व इतर दोन खाजगी व्यक्तींनी छापा टाकला असता महिंद्रा जितो टेम्पो क्र. एम.एच.44 यु.0585 मध्ये राजनिवास पान मसाला , बाबा पानमसाला , रत्ना सुगंधीत तंबाखू , विमल पानमसाला , आर . एम . डी . गुटखा , बाबा तंबाखू असा 59हजार803 रुपयांचा गुटखा व गुटखा विक्रीसाठी आणलेले वाहन असा एकुण 4 लाख 59 हजार 803 रुपयांचा गुटखा जप्त करत दोघा विरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम 328,272,273 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button