रस्त्यांच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात केले “झंडू बाम “आंदोलन. A “Zandu Bam” movement was launched against those responsible for the devastation of the roads

बीड — शहरातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर तसेच अहमदपूर-अहमदनगर तसेच बीड-अहमदनगर तसेच राज्यमार्ग आणि शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून वाहनधारकांना मोठ्या अडचणीस तोंड द्यावे लागत असून कंबरदुखी तसेच मणक्याचे आजार वाढले आहेत , थातूरमातूर खड्डे बुजवून राजकीय कार्यकर्ते यांचे खिसे भरण्याचे काम होत असून मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात येत आहे.संबधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी झंडू बाम आंदोलन करण्यात आले.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे शहरातुन जाणा-या १२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे दुभाजक तसेच नाल्याचे काम अपुर्णच असुन चिखलमय रस्ता झाला आहे तसेच शहरातुन जाणारा अहमदनगर-बीड राज्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे तसेच शहराच्या हद्दीतील रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय तहसिल कार्यालय,प्रशासकीय भवन,जिल्हा न्यायालयासह ईतर शासकीय कार्यालयात येणा-यांसह शहरातील नागरीकांची खड्ड्यांमुळे मोठी कसरत होत आहे. शहरांतर्गत जुना मोंढा,कारंजा रोड,नगर रोड,आदि भागातील खड्ड्याचे साम्राज्यास राजकीय नेते आणि प्रशासकीय आधिकारी जबाबदार असुन त्यांच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “मोफत झंडुबाम तसेच वेदनाशामक वाटप आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर ,राहुल कवठेकर, सय्यद आबेद बीडकर,शेख मुस्ताक,माजी सैनिक अशोक येडे,सय्यद सादेक,धनंजय सानप,दिपक बांगर, किस्किंदाताई पांचाळ,सारीका गायकवाड, आदि सहभागी होते. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी,प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण औरंगाबाद अरविंद काळे,तसेच मुख्यमंत्री ,प्रधान सचिव नगरविकास मंत्री ,सार्वजनिक बांधकाम मंत्री,विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना देण्यात आले.
.
खड्डे भरण म्हणजे राजकीय कार्यकर्ते-आधिकारी पोसण्यासाठी भ्रष्टाचाराचे कूरण
बीड शहरातील शहरांतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजण्याचे काम जाणीवपुर्वक थातूरमातूर करत राजकीय नेत्याचे बगलबच्चे प्रशासकीय आधिकारी यांचे खिसे भरण्यासाठी करण्यात येत असून भरलेले खड्डे महिनाभरातच पुन्हा पुर्ववत होत असून संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच
बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग तसेच शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून निकृष्ट रस्त्याप्रकरणात संबधित कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करण्यात येऊन मयताच्या कुटुंबियास नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे