अन्न व औषध उपायुक्तांचा गुटख्याची टोपली भेट देत केला सत्कार. The Deputy Commissioner of Food and Drugs was felicitated by gifting a basket of gutkha

बीड — बीड जिल्ह्यात सर्रास खुलेआम गूटखा विक्री सुरू असल्याच्या निषेधार्थ अन्न औषध प्रशासनाचे उपायुक्त इम्रान हाश्मी यांचा हार लावलेल्या टोपलीत गुटखा, सिगारेट, तंबाखू यासह विविध प्रकारचा पान मसाला देऊन अनोखा सत्कार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी भरमसाठ पगारी घेत असले तरी नऊ महिन्यांमध्ये केवळ गुटख्याच्या विरोधात त्यांनी एकच कारवाई केली आहे.
तर दुसरीकडे बीडच पोलीस प्रशासन हे आठवड्यातून दोन- तीन कारवाया गुटख्याच्या करतात. मग पोलिसांना दिसणारा गुटखा अन्न औषध प्रशासनाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना का दिसत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्याच बरोबर गुटखा माफियांना याच अधिकाऱ्यांचं पाठबळ असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव नीलकंठ वडमारे यांनी यावेळी म्हणाले की बीड शहरासह जिल्ह्यात टपरी, किराणा दुकान यासह विविध प्रकारच्या दुकानांमध्ये गुटख्याची सर्रास खुलेआम विक्री होत आहे. मात्र अन्न औषध प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई केली जात नाही. हे अधिकारी केवळ खुर्चीला भार बनले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे . जर बीड जिल्ह्यातील गुटखा माफीयांना लगाम लावला नाही.कठोर कारवाई केली नाही. तर अन्न पुरवठा मंत्री यांना घराबाहेर निघू देणार नाहीत असा इशारा नीलकंठ वडमारे यांनी दिला आहे