आष्टी नगर रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त ठरला.The time has come for the inauguration ceremony of Ashti Nagar Railway

बीड — बीड वासियांच्या स्वप्नांची काही अंशी पूर्तता होणार असून आष्टी नगर रेल्वेच्या लोकार्पण सोहळा 23 सप्टेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन कुमार यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे उपस्थित राहणार आहेत. आष्टी येथे हा रेल्वेच्या लोकार्पणचा सोहळा पार पडणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होणार आहे. याचा लोकार्पण सोहळा आष्टी येथे होत आहे. यापूर्वी अनेक वेळा या रेल्वेच्या उद्घाटनाचे मुहूर्त ठरले होते. मात्र ऐनवेळी लोकार्पण सोहळा रद्द करण्यात येत होता. अखेर आता 23 सप्टेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. नगर परळी रेल्वे मार्गाची 261 किलोमीटर एवढी लांबी आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी देखील पूर्ण झाली. परंतु, केवळ लोकार्पण सोहळ्याच्या प्रतिक्षेत ही रेल्वे सुरू होत नव्हती.मात्र नगर ते आष्टी रेल्वेच अधिकृत उद्घाटन करण्यास मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे या मार्गावर धावणारी रेल्वे नगर रेल्वे स्थानकावर तीन महिन्यापासून एकाच जागेवर उभी आहे. नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर 29 डिसेंबर 2021 रोजी रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवासी रेल्वे सुरू होण्याचा दोन वेळेस मुहूर्त ठरला. परंतु, ऐनवेळी सगळे मुहूर्त लांबले आणि आता दहा महिन्याच्या कालावधीनंतर रेल्वे सुरू होईल. त्यामुळे बीडच्या नागरिकांचं जवळपास 30 वर्षांनी पूर्ण होत आहे. बीडकरांचं स्वप्न असलेल्या नगर परळी रेल्वे मार्गाचं काम तातडीने पूर्ण कराव यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी विशेष लक्ष द्यावं अशी मागणी होऊ लागली आहे.