आरोग्य व शिक्षण

स्वा रा ती वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा 8 दिवसांत  सुरू होणार

बीडअंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळेस मागील काही दिवसांपूर्वी ना. मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली होती, जिल्ह्यातील स्वॅब तपासणीचा आलेख व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, येत्या 8 दिवसांच्या आत ही प्रयोगशाळा प्रत्यक्ष सुरू होणार असून, अंबेजोगाई येथेच आता कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे असे ना. मुंडे म्हणाले.

मागील आठवड्यात ना. मुंडे यांनी स्वाराती रुग्णालयात भेट देऊन तेथील एमआरआय मशीनची अनेक दिवसांची मागणी पूर्ण केली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात हाफकीन महामंडळामार्फत 7 व्हेंटलेटर्स देखील मिळवून दिले होते.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close