आपला जिल्हा

कोरोनाची अर्धशतकी वाटचाल: बीडमध्ये पुन्हा दोन रुग्ण सापडले

बीडप्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेल्या 57 अहवालापैकी 50 अहवाल काल निगेटिव आले होते. सात प्रलंबित होते त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात सक्रिय कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्याची अर्धशतकाकडे वाटचाल झाली आहे.
रविवारी 57 स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते मात्र सुदैवाने 50 रुग्णांचे अहवाल निगेटिव आल्यामुळे सोमवारी रुग्ण सापडण्याची मालिका खंडित झाली होती. 57 पैकी सात अहवाल प्रलंबित होते. ते प्रलंबित अहवाल प्राप्त झाले असून पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. हे दोन्ही रुग्ण बीड शहरातील आसून आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या 49 वर जाऊन पोहोचली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close