मोंढ्याच्या जागेच्या संचिका गहाळ प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना खुलासा करण्याचे आदेश. Order to disclose missing file of Agricultural Produce Market Committee to three employees

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेचे प्रकरण
आठ दिवसाच्या आत गहाळ संचिका बाबत खुलासा सादर करण्याचे आदेश
बीड — शहरातील नगर भूमापन कार्यालयातील ७ एकर जागेची नोंद घेतलेली कागद पत्राची संचिका भूमी अभिलेख कार्यालयातून गहाळ झाली आहे. या प्रकरणी उपअधीक्षक भूमी अभिलेख बीड यांनी तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली असून आठ दिवसाच्या आत गहाळ संचिके बाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत संचिका गहाळ प्रकरणी खुलासा समाधान कारक न आल्यास शासन नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी तंबी नोटिसमध्ये दिली आहे.
मुख्य सहायक यु.पी. सानप व सेवा निवृत्त परिक्षक भूमापक एच.व्ही. तिवारी, परिक्षण भूमापक उजगरे अशी नोटीस बजावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहरातील जुना मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती बीड यांच्या नावाने 2 हेक्टर 80 आरची नोंद पी आर कार्डला ज्या कागद पत्रा आधारे घेतलेली आहे ती संचिका मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे दोन वर्षांपूर्वी अर्ज केला होता. उप अधीक्षक बीड यांच्याकडे चालू असलेल्या प्रकरणात ही संचिका सादर करण्याचे अभिलेख पाल आणि परीक्षण भूमापक बीड यांना आदेश देण्यात आली होती मात्र, त्यांना संचिका देण्यात आली नाही प्रकरणात ही सादर करण्यात आली नाही. त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर संचिका गहाळ झाली असल्याची बाब समोर आली. या प्रकरणी त्यांच्याकडून सदरील संचिका मिळण्यासाठी नियमित प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, उपअधीक्षक भूमी अभिलेख माणिक मुंडे यांनी सानप व तिवारी यांना नोटीस बाजवली आहे. त्यात नुमूद केले आहे की, बीड शहरातील सर्व्हे नंबर १ व २ ची मोजणी सन २००७ मध्ये झाली होती. सदरील संचिकेची आज शोध घेतला असता ती आढळून येत नाही. आपली बदली झाली असता त्यावेळी ही संचिका आपण कोणाकडे हस्तांतरीत केली होती, ती हस्तांतरण यादी आठ दिवसात दाखल करावी किंवा त्या संचिकेचा शोध घेऊन सादर करावी. या संचिकेबाबत लेखी म्हणने सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असे नोटीसमध्ये म्हटले आहे. यु.पी. सानप हे मुख्यालय सहायक म्हणून शिरुर येथे सध्या कार्यरत आहेत तर तत्कालीन परिक्षक तिवारी सेवा निवृत्त झाले आहेत.
या पुर्वी ही बाजावल्या आहेत इतरांना नोटीस
तत्कालीन परीक्षण भूमापक आर.आर. विभुते, तत्कालीन नगर भूमापन लिपिक व्ही.डी. मुळे व अभिलेखापाल व्ही.बी. सोनवणे यांना समज देऊन संचिकेचा शोध घेऊन ती सादर करण्याचे यापुर्वी आदेशित केले होते. ५ फेब्रुवारी २०२१ च्या लेखी खुलाशात सदरची संचिका अभिलेखात शोध घेतला असता आढळून येत नाही, असे उपअधीक्षक माणिक मुंडे यांनी जिल्हा अधीक्षकांना पत्रान्वये कळवले होते. त्या पत्रावर उत्तर देताना भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक दादासाहेब घोडके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करुन नियमानुसार गहाळ संचिका पुनर्गठीत करावी, असे आदेशित केले होते. आता पुन्हा याच प्रकरणी इतर तीन कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.