ताज्या घडामोडी

गडकरी साहेब;बीड-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण राहु द्या; आधी मत्स्य पालन केंद्रास परवानगी द्या.Gadkari Saheb; Let the Beed-Ahmadnagar National Highway be four-lane; First give permission to fish breeding center

बीड — बीड-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याचं वर्षभरापुर्वी आ.सुरेश धस यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन प्रसारमाध्यमांना कल्पना दिली होती परंतु आजची रस्त्याची दुरावस्था पाहता चौपदरीकरण राहु द्या मत्स्य पालन केंद्राची परवानगी आ.सुरेश धस यांनी मिळवुन द्यावी अशी मागणी ईमेल द्वारे नितिनजी गडकरी यांना केली आहे.


बीड -अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या १४०.७७५ कि.मी. लांबी असलेल्या एकूण १०५० कोटी रूपये किंमतीच्या रस्ते कामास मंजुरी मिळणार असून कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती दि.१७ जुलै २०२१ रोजी आ.सुरेश आण्णा धस यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती ,यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांची आ.सुरेश धस यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन बीड ते अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी दर्जाच्या कामास मंजुरी मिळावी तसेच या संपूर्ण रस्त्यावरील अपघातस्थळ असलेल्या जागी रुंदीकरण तसेच प्रमुख गावाजवळ सर्व्हिस रोड करणेबाबत सकारात्मक चर्चा होऊन नितिनजी गडकरी यांनी लवकरच कामास मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे आ.सुरेश धस यांनी म्हटले होते.या घटनेला वर्ष होऊन गेले परंतु रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही. मात्र सध्या रस्त्याची दुरावस्था असुन आष्टी तालुक्यातील मौजे.चिंचपुर गावाजवळील “गौरी रेस्टॉरंट “समोरील राष्ट्रीय महामार्गावरील मोठमोठाले खड्डे व पावसाळ्यात त्याठिकाणी साचलेले पाणी पाहता त्याठिकाणी मत्स्य पालन केंद्र उभारण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button