आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आता अकरा तास ढिल , खुशाल हिंडा ,कोरोना सोबत जगायचं शिका !

बीडजिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पूर्वी सात तास शिथिलतेची वेळ वाढवून देत आता अकरा तास वाढवण्यात आली आहे.दररोज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंतसर्व आस्थापना चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे मात्र सोशल डिस्टन्स चे नियम न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. केश कर्तनालय ब्युटीपार्लर सारख्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे तर दारूच्या दुकानांना लवकरच परवानगी देण्यात येईल असेही आदेशात म्हटले आहे.या कालावधीत कुठल्याही पासची आवश्यकता लागणार नाही.

■ शाळा, कॉलेज, शैक्षणिक, प्रशिक्षण शिकवणी केंद्र बंद राहील .ऑनलाइन शिक्षण सुरु राहील.

■ सामन्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील. 

■ सरकारी कर्मचारी त्याचबरोबर अलगीकरण आणिक विलगीकरण कक्ष यांच्यासाठी असलेली  उपाहारगृहे वगळता सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट व इतर सेवा देणाऱ्या अस्थापना बंद राहतील. पार्सल सुविधा सुरू राहील.

■ सर्व सिनेमागृह,  मॉल , व्यायाम शाळा,  जलतरण तलाव,  मनोरंजन  उद्याने , प्रेक्षागृह सभागृह बंद . सर्व सामाजिक-राजकीय कार्यक्रमास बंदी राहील.

■ दुचाकी – एक चालक, तीनचाकी – चालक+दोन प्रवासी , चार चाकी -चालक + दोन प्रवासी याप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. 

■ जिल्हांतर्गत बससेवेला केवळ 50 टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे.

■ बार व दारू दुकानांना परवानगी देण्यासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार. 

■ पान टपरी,  तंबाखू , गुटखा , पान मसाला या सर्व बाबींच्या विक्री आणि सार्वजनिक सेवनास बंदी कायम राहील.

■ सर्व केशकर्तनालय (कटिंगची दुकाने ) ब्युटी पार्लर व तत्सम दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

■संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या काळामध्ये जीवनावश्यक सेवांशी संबंधित व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती पास असूनही घराबाहेर राहू शकणार नाही.

■ बँकांनी शासनाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे काम करावे. 

■ कोणत्याही दुकांनामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्ती असून नये.

■ सदरील आदेश 31 मे 2020 रोजी रात्री 12 पर्यंत लागू राहतील. 

याप्रमाणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज आदेश काढले आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close