क्राईम

पाचेगावात चोरट्यांनी पाच दूकान फोडली; लाखोंचा ऐवज लंपास.Five shops were broken into in Pachegaon and goods worth lakhs were stolen

गेवराई — पाऊस सुरू असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील पाचेगाव येथील व्यावसायिकांच्या दुकानाचे शटर उचकटून लाखो रुपये लंपास केल्याची घटना बुधवार ता. 7 रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. तालुक्यातील विविध भागात चोरटे सक्रिय झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन मेडिकल, एक अ‍ॅग्रो एजन्सी आणि एका सोन्याच्या दुकानाला लक्ष करून नगदी रोकड लंपास केली आहे.

याबाबत अधिक असे की, जिल्ह्यात रात्री सर्वदूर जोरदार पाऊस सुरू होता. या पावसाची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील पाचेगाव येथील बाबूराव गाडे यांच्या मालकीचे माऊली अ‍ॅग्रो हे बियाणांचे दुकान फोडून दुकानातील गल्ल्यातील हजारोची रक्कम चोरून नेली. डॉ. फुलझळके यांचे फुलझळके मेडिकल, डॉ. रोहीत राठोड यांचे देवा मेडिकल, ज्ञानेश्‍वर चव्हाण यांचे माऊली मेडिकल तर गणेश दहिवाळ यांचे दहिवाळ सुवर्णकार दुकान फोडून दुकानामधील लाखो रुपये चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज असून या प्रकरणी तक्रार देण्यासाठी दुकान मालक गेवराई पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत. घटनेची माहिती कळताच गेवराई पोलीस ठाण्याचे बीट अमलदार ए.बी. शेळके घटनास्थळी गेले. पंचनामा करून माहिती घेतली. चोरीच्या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बुधवारी पाऊस सुरू होता. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी व्यावसायिकांच्या दुकानाचे शटर उचकटून लाखो रुपये लंपास केला आहे. तालुक्यातील विविध भागात चोरटे सक्रिय झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी तीन मेडिकल, एक अ‍ॅग्रो एजन्सी आणि एका सोन्याच्या दुकानाला लक्ष करून नगदी रोकड लंपास केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button