क्रीडा व मनोरंजन

सलोखा आणि बंधूभाव जपत घरच्या घरीच साजरी करा रमजान ईद ,धनंजय मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा

परळी — : सोमवार (दि. 25) रोजी साजऱ्या होत असलेल्या रमजान ईद निमित्त राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुस्लिम समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. सामाजिक सलोखा, बंधूभाव जपत घरच्या घरीच रमजान ईद साजरी करावी असे ना. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

गेल्या दोन अधिक महिन्यांपासून राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू आहे. याच काळात नागरिकांना विविध सण – उत्सव घरच्या घरी साजरे करावे लागले. गेल्या एक महिन्यापासून मुस्लिम बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास देखील सुरू होते. यादरम्यान मुस्लिम बांधवांनी नमाज, सहरी, इफ्तार आधी धार्मिक विधी घरच्या घरीच साजरा केले.

सोमवारी मुस्लिम बांधवांचा ईद – उल – फित्र अर्थात रमजान ईद हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. कोरोना विषाणूचा सर्वत्र झालेला शिरकाव व संभाव्य धोका लक्षात घेता, सर्व समाज बांधवांनी घरच्या घरीच ईद साजरी करावी. एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी कुठेही एकत्र न जमता, मोबाईल फोन, सोशल मिडियासह अन्य माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहनही ना. मुंडे यांनी केले आहे.

रमजान ईद हा सामाजिक सलोखा, बंधूभाव वाढीस घालणारा एक सण आहे, आपल्या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून ना. मुंडे यांनी ईद निमित्त पठण करण्यात येणारी नमाज कुटुंबासमवेत घरीच अदा करावी तसेच कोरोनापासून जगाची सुटका लवकरात लवकर व्हावी अशी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close