महाराष्ट्र

मराठवाडयातील एका ज्येष्ठ मंत्र्यास कोरोनाची लागण

नांदेड – राज्याच्या एका मंत्र्याला कोरोना ची लागण झाली होती मात्र उपचारानंतर हे मंत्री बरे झाले. आता मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान मंत्र्याचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे खळबळ माजली आहे. नांदेड येथे रुग्णांची संख्या आता 127 वर जाऊन पोहोचली आहे.

कोरोना संसर्गाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून मंत्री सुद्धा बाधित होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एका मंत्र्याला कोरोणाची लागण झाली त्यावेळी खळबळ माजली होती मात्र हे मंत्री महोदय उपचारानंतर ठिक झाले असून त्यांनी आपल्या कामकाजासही सुरुवात केली आहे. तर दुसरे एक मंत्री सध्या मुंबई येथे उपचार घेत आहेत. महा विकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले मराठवाड्यातील कॉंग्रेसचे एक दिग्गज ज्येष्ठ नेते ‌व माजी मुख्यमंत्री विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन आठवडे मुंबईमध्ये वास्तव्यास होते. मुंबईहून याच आठवड्यात ते आपल्या मतदार संघात परत आले. मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सकाळी त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला. सायंकाळी आलेल्या अहवालात ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यासोबतच विधान परिषदेचे एक आमदार सुद्धा काही दिवस मुंबईत होते त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माजी मुख्यमंत्री यांची प्रकृती चांगली असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close