ताज्या घडामोडी

वैद्यकीय व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्नशील नेत्यांचा सन्मान;मोफत झंडुबाम वाटप आंदोलन. Honoring the leaders who strive for the growth of medical profession; free Zandubam distribution movement

बीड — शहरातुन जाणा-या राष्ट्रीय महामार्ग,राज्यमार्ग आणि शहरांतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून वाहनधारकांना मोठ्या अडचणीस तोंड द्यावे लागत आहे. कंबरदुखी तसेच मणक्याचे आजार वाढले आहेत ,धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे शहरातुन जाणा-या 12 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे दुभाजक तसेच नाल्याचे काम अपुर्णच असुन चिखलमय रस्ता झाला आहे तसेच शहरातुन जाणारा अहमदनगर-बीड राज्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे तसेच शहराच्या हद्दीतील रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय,तहसिल कार्यालय,प्रशासकीय भवन,जिल्हा न्यायालयासह ईतर शासकीय कार्यालयात येणा-यांसह शहरातील नागरीकांची खड्ड्यांमुळे मोठी कसरत होत आहे.

शहरांतर्गत जुना मोंढा,कारंजा रोड,नगर रोड,आदि भागातील खड्ड्याचे साम्राज्यास राजकीय नेते आणि प्रशासकीय आधिकारी जबाबदार असुन त्यांच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “मोफत झंडुबाम वाटप आंदोलन करण्यात येणार असून वैद्यकीय व्यावसाय वृद्धीसाठी प्रयत्नशील राजकीय नेते-प्रशासकीय आधिका-यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .

वैद्यकीय व्यवसायवृद्धीबद्दल राजकीय नेते-आधिका-यांना सन्मानित करणार
बीड शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेस राजकीय नेते आणि प्रशासकीय आधिकारीच जबाबदार असुन यामुळेच बीड शहरातील वैद्यकीय व्यवसाय वृद्धींगत होत असून सामाजिक कार्यकर्ते तसेच वैद्यकीय व्यावसायिकांतर्फे राजकीय नेते-प्रशासकीय आधिका-यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button