देश विदेश

भारत मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये पाकिस्तान, नेपाळपेक्षाही मागे

नवी दिल्ली –, भारतातील टेलिकॉम कंपन्या इंटरनेट स्पीड संदर्भात मोठमोठे दावे करतात मात्र परिस्थिती उलट असल्याचे उकला स्पीड टेस्ट ने जाहीर केलेल्या यादीवरून स्पष्ट होत आहे. पाकिस्तान नेपाळ यांच्यापेक्षाही भारतातील मोबाईल ब्राॅडबॅंड स्पीड ची स्थिती खराब आहे

उकला स्पीड टेस्ट एप्रिल 2020 च्या आकड्यांनुसार, भारतात मोबाईल ब्रॉडबँडचा सरासरी डाऊनलोडिंग स्पीड 9.81Mbps आणि सरासरी अपलोड स्पीड 3.98Mbps आहे. उकला दर महिन्याला मोबाईल ब्रॉडबँडच्या स्पीडबाबत जवळपास 139 देशांची यादी जाहीर करत असते.

उकलाने एप्रिल 2020 मध्ये मोबाईल ब्रॉडबँड स्पीडबाबत 139 देशांची यादी जाहीर केली असून, यात भारत 132 व्या स्थानावर आहे. या यादीत पाकिस्तान 112 आणि नेपाळ 111, श्रीलंका 115 आणि बांगलादेश 130 व्या स्थानावर आहे.
जगभरात मोबाईल ब्रॉडबँडचा सरासरी डाऊनलोडिंग स्पीड 30.89Mbps आणि अपलोडिंग स्पीड 10.50Mbps आहे. रिपोर्टनुसार, सर्वाधिक इंटरनेट स्पीड 88.01Mbps दक्षिण कोरिया या यादीत पहिल्या स्थानावर आहे. यानंतर कतार, चीन, यूएई आणि नेदरलँड या देशांचा समावेश आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close