क्राईम

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या युवकास अटक

मुंबई —  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडविण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र एटीएस पथकाने शनिवारी अटक केली. कामरान खान असे या तरुणाचे नाव असून रविवार दि.24 मे रोजी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे पोलिसांच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी सोशल मीडिया डेस्क सुरू करण्यात आला होता. या डेस्कसाठी असलेल्या मोबाइल क्रमांकावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याचा एक निनावी संदेश आला. या संदेशामुळे उत्तर प्रदेशमधील पोलिस यंत्रणा दक्ष होत तपास करत होती. याबाबत लखनऊ येथील गोमतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान, हा फोन महाराष्ट्रातून आल्याचे कळताच याबाबतची माहीती उत्तर प्रदेश पोलिसांनी एटीएसला दिली आणि तपासाची चक्रे फिरली. 
तांत्रिक पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने कामरान खान या तरुणाला चुनाभट्टी येथील म्हाडा कॉलनीतून शोधून काढले. कामरानला उद्या रविवारी न्यायालायात हजर करण्यात येणार असून ट्रान्झिट रिमांड मंजूर केल्यास त्याचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना देण्यात येईल, अशी माहीती एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान त्याने धमकी नेमकी कशासाठी दिली? याबाबत चौकशी सुरू असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close