कृषी व व्यापार

विजेच्या तारेला चिटकून दोन म्हशीचा मृत्यू Two buffaloes died after being hit by an electric wire

बीड — गेल्या काही दिवसापासून वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार दिसू लागला आहे अनेक भागातील शेतकरी वितरण कंपनीच्या लाईनमन यांच्याकडे तक्रार करतात परंतु या तक्रारीची दखलही घेतली जात नाही काल शिदोड परिसरात वादळाने विद्युत पोल कोसळलेले होते ही गोष्ट कोणालाही माहित नव्हती मात्र एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जमिनीवर पडलेल्या तारेला चिटकून दोन म्हशी दगावल्याची घटना घडली आहे

शिदोड येथील बालाजी मुकुंद कुंभारकर या शेतकऱ्याने म्हशी चारण्यासाठी शेतामध्ये सोडून दिल्या होत्या मात्र शेतात वादळामुळे विद्युत पोल कोसळलेले कुणाच्याही लक्षात आले नाही तीन मशीन चरता-चरता विद्युत पोल जवळ गेल्याने विजेच्या तारेला चिकटल्या त्यातील दोन म्हशी जागेवर मृत पावले असून जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे यावेळी वीज वितरण कंपनीच्या लाईनमनला संपर्क साधण्याचा फोन केला असता त्याने साधा फोनही उचलण्याची मानसिकता दाखवली नाही एक म्हैस सध्या गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे अनेक वेळा संपर्क साधूनही त्यांची साधी दखलही घेतली जात नाही या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button