आरोग्य व शिक्षण

गालबोट लागले: आष्टीत आढळला कोरोना रूग्ण; तो मृत युवक निगेटिव

बीडप्रारंभी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 42 पैकी 35 अहवाल निगेटिव आले मात्र सात प्रलंबित अहवाल पैकी एक पॉझिटिव आला तो आष्टी तालुक्यातील आहे. सहा अहवाल अनिर्णीत अवस्थेत आहे. तर आयसोलेशन वार्ड मध्ये गुरुवारी मृत्यू झालेल्या युवकाचा अहवाल निगेटिव आला आहे

चार दिवसापासून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला लगाम बसला असून जिल्ह्यातून पाठवण्यात आलेल्या 42 स्वॅब पैकी शुक्रवारी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा मुंबई येथून आष्टी तालुक्यातील धनगरवाडी येथे आलेला असून त्याचे वय 37 वर्ष एवढे आहे.
जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. माजलगाव तालुक्यात सर्वाधिक 15 ,बीड 5, केज 2 , पाटोदा 3 , गेवराई 2, धारूर 1, वडवणी 1, आष्टी-1 अशी रुग्ण संख्या आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close