आरोग्य व शिक्षण

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आहाराचे विशेष महत्व – डॉ . अनिता पोथरकर.The special importance of diet in the formation of students – Dr. Anita Potharkar

चौसाळा — किशोर वयातील मुलामुलींनी आपल्या आहारात योग्य पोषणमूल्य असणाऱ्या खादयपदार्थांचा समावेश करावा त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहील असे प्रतिपादन डॉ . अनिता पोथरकर यांनी केले .

कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे दि 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2022 दरम्यान गृहशास्त्र व महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पोषण सप्ताह उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . दीपा क्षीरसागर उपस्थित होत्या . तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . विलास भिल्लारे कमविचे उपप्राचार्य प्रा . गणपती ढवळशंख , प्रा . शाहीन सय्यद , डॉ . सई पोथरकर उपस्थित होते . पुढे बोलताना डॉ . पोथरकर म्हणाल्या की , विद्याथ्र्यांनी आपल्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे . आज विशेषतः मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण मोठे आहे . याकडे आपण दुर्लक्ष केले तर येणारी पिढी सुध्दा दुर्बल जन्माला येईल . म्हणून पालकांनी सुध्दा वाढत्या वयातील मुलांना चांगला पोषणयुक्त आहार देणे गरजेचे आहे . विद्यार्थ्यांनी मोबाईलमधून वेळ काढून थोडावेळ मैदानावर दयावा . याप्रसंगी डॉ . सई पोथरकर यांनी काय खावे व काय खाऊ नये याबददल मार्गदर्शन केले . अध्यक्षीय भाषण करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . दीपा क्षीरसागर म्हणाल्या की , आज जंकफुडचे दुष्पपरिणाम सर्वत्र दिसत आहेत . भेसळयुक्त खाद्यपदार्थामुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे . सध्याच्या काळात आपण अन्न जर औषधासारखे नाही खाल्ले तर काही दिवसांनी औषधे अन्नासारखी खावी लागतील . यासाठी आपल्या आहाराकडे आपण जागरूकपणे लक्ष दिले पाहिजे , आहार हा चौरस असायला पाहिजे आपली आजी काय खात होती त्याप्रकारचे अन्न आपण खाल्ले पाहिजे अशा प्रकारच्या पोषण सप्ताह कार्यक्रमातून आहाराबददल जागरूकता निर्माण होईल असा आशावादही डॉ . दीपा क्षीरसागर यांनी व्यक्त केला . या कार्यक्रमाचे उद्घाटन कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले . प्रास्ताविक प्रा . सय्यद शाहीन यांनी केले , सुत्रसंचालन प्रा . अरूणा नावेकर यांनी केले तर आभार प्रा . पवार मॅडम यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमाला प्रा . काशीद मॅडम , प्रा . गिराम मॅडम , प्रा . सोमनाथ लांडगे , प्रा . सुधीर माने , प्रा . काकासाहेब पोकळे , प्रा . संजय कदम , प्रा . कुरूंद , विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button